श्री पांजरपोळ संस्था ही कोल्हापूरमधील सर्वात जुनी आणि सेवाभावी संस्था असून, गेल्या अनेक दशकांपासून भटक्या, जखमी, आजारी व सोडून दिलेल्या जनावरांचे संरक्षण करत आहे. संत-महंतांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या मदतीने संस्था आजही कार्यरत आहे.
श्री पांजरपोळ संस्था - एक पवित्र सेवा परंपरा
जीवदेयेच्या कामात महाराष्ट्रात अग्रगण्य अशी पांजरपोळ संस्थेची स्थापना १०८ वर्षापूर्वी, दानशूर व जीवदया प्रेमी, कोल्हापूर स्टेटचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने व त्यांच्या सहयोगाने करणेत आली. सदर पांजरपोळचे कार्य कोल्हापूरातील गूळ व्यापारी असोसिएशनच्या सभासदांच्या सहकार्याने चालते. गूळाच्या विक्री बिलांवर पांजरपोळ सेस घेणेत येतो आणि त्या रकमेचा संपूर्ण विनियोग पशु सेवा व जीवदयेचे कार्य राबविणेसाठी करणेत येतो.
कोल्हापूरच्या शाहूपुरी परिसरात स्थापित ही संस्था अनेक दशकांपासून जनावरांचे रक्षण आणि सेवा करण्यासाठी कार्यरत आहे. महानगरातील अपघातग्रस्त, निराधार, जखमी किंवा सोडून दिलेली जनावरे येथे आणली जातात. तज्ञ डॉक्टर, सेवक व स्वयंसेवक यांच्या मदतीने या जनावरांची काळजीपूर्वक सेवा केली जाते.
पांजरपोळचे प्रांगणात श्रीकृष्ण भगवानचे सुंदर मंदिर बनविणेत आले आहे व त्या मध्ये आकर्षक अशी भगवान श्रीकृष्णच्या मूर्तिची स्थापना करणेत आली आहे. प्रत्येक जनावरांना ऐकू येईल असे गायत्री मंत्र, नवकार मंत्र आदि मंत्राक्षरांची कॅसेट नेहमी चालू असते. त्या मुळे संपूर्ण वातावरण पवित्र व प्रसन्न राहते. पांजरपोळचा परिसर नेहमी स्वच्छ राहील या कडे कटाक्षाने लक्ष पुरविले जाते.




जनावरांसाठी प्रेम, सेवा आणि सुरक्षितता
गायी व इतर निराधार जनावरांचे संरक्षण, उपचार, पोषण आणि पुनर्वसन करणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. शहरातील भटक्या व अपघातग्रस्त जनावरांना सुरक्षित आश्रय देणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे.
एका अपघातग्रस्त गायीला उपचार करून नवजीवन दिल्याची 1–2 ओळीची खरी कहाणी...
अपघातात जखमी झालेली एक गाय काही दिवस अंथरुणाला खिळली होती. आमच्या डॉक्टरांनी व स्वयंसेवकांनी तिची काळजी घेतली आणि आज ती पुन्हा उभी आहे—आमच्या सेवेमुळे नवीन जीवन देण्यात आले.
आपले बहुमोल दान.. मुक्या जीवांना अभयदान..
संस्थेबद्दल
दक्षिण महाराष्ट्राच्या पवित्र भूमिवर
श्री महालक्ष्मी मंदिर, नरसोबावाडी, श्री जोतिबा मंदिर
श्री कुंभोजगिरी तीर्थ, सीमंधरधाम, कलश मंदिर,
इत्यादि तीर्थक्षेत्राच्या पावन सानिध्यात कोल्हापूर नगरीत
१०८ वर्षापासून जिवदये करिता कार्यरत
श्रीपांजरपोळ संस्था शाहूपुरी. कोल्हापूर.
स्थानिक संपर्क
श्री पांजरपोळ संस्था
१२९१ ई, शाहू मिलचे मागे,
राजारामपुरी सातवी गल्ली, कोल्हापूर – ४१६ ०००
- ०२३१-२६९२८७२, ३२५३६७६
- contactus@panjarpol.com
लोकेशन
© 2025 Designed with Pro Web Graphics
