निराधार जनावरांचे घर - श्री पांजरपोळ संस्था
श्री पांजरपोळ संस्था - एक पवित्र सेवा परंपरा
जीवदेयेच्या कामात महाराष्ट्रात अग्रगण्य अशी पांजरपोळ संस्थेची स्थापना १०८ वर्षापूर्वी, दानशूर व जीवदया प्रेमी, कोल्हापूर स्टेटचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने व त्यांच्या सहयोगाने करणेत आली. सदर पांजरपोळचे कार्य कोल्हापूरातील गूळ व्यापारी असोसिएशनच्या सभासदांच्या सहकार्याने चालते. गूळाच्या विक्री बिलांवर पांजरपोळ सेस घेणेत येतो आणि त्या रकमेचा संपूर्ण विनियोग पशु सेवा व जीवदयेचे कार्य राबविणेसाठी करणेत येतो.
कोल्हापूरच्या शाहूपुरी परिसरात स्थापित ही संस्था अनेक दशकांपासून जनावरांचे रक्षण आणि सेवा करण्यासाठी कार्यरत आहे. महानगरातील अपघातग्रस्त, निराधार, जखमी किंवा सोडून दिलेली जनावरे येथे आणली जातात. तज्ञ डॉक्टर, सेवक व स्वयंसेवक यांच्या मदतीने या जनावरांची काळजीपूर्वक सेवा केली जाते.
पांजरपोळचे प्रांगणात श्रीकृष्ण भगवानचे सुंदर मंदिर बनविणेत आले आहे व त्या मध्ये आकर्षक अशी भगवान श्रीकृष्णच्या मूर्तिची स्थापना करणेत आली आहे. प्रत्येक जनावरांना ऐकू येईल असे गायत्री मंत्र, नवकार मंत्र आदि मंत्राक्षरांची कॅसेट नेहमी चालू असते. त्या मुळे संपूर्ण वातावरण पवित्र व प्रसन्न राहते. पांजरपोळचा परिसर नेहमी स्वच्छ राहील या कडे कटाक्षाने लक्ष पुरविले जाते.
वाढती महागाई व पांजरपोळ मध्ये दाखल होणाऱ्या जनावरांच्या संख्येत होत असलेली वाढ या मुळे पांजरपोळचा खर्च सतत वाढत चालला आहे. पांजरपोळ मध्ये आलेल्या जनावरांचा चारा औषध इत्यादि साठी वार्षिक ४० ते ५० लाखा पर्यंत खर्च येत आहे.
संस्थेने जनावरांच्या देखभालीसाठी खास स्टाफ नेमलेला आहे. अशक्त, अपंग, वृद्ध व आजारी जनावरांच्या सुश्रुषेसाठी सुविधायुक्त चिकित्सालय बांधणेत आले आहे. जनावरांचे तज्ज्ञ डॉक्टर्सद्वारे ऑपरेशन व चिकित्सा करणेत येते. आजारी जनावरांची खास देखभाल करणेत येते. पांजरपोळमध्ये जनावरां करिता प्रशस्त ८ शेड बांधणेत आले आहेत. घासचाऱ्याच्या संग्रह करणेसाठी अलग शेड बांधणेत आले आहे. संस्थेकडे जनावरांच्या सोयी साठी ४०० जनावरां करीता जागा आहे. जनावरांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय करणेत आली आहे.
पांजरपोळमध्ये आज मितीला ४०० च्या आसपास जनावरे आहेत. त्यातील दुध देणाऱ्या जनावरांचे प्रमाण फारच कमी आहे. हे दुध मंदिरामध्ये प्रभुप्रक्षाल करिता तसेच लहान मुलांना दुग्धपानासाठी व आजारी व्यक्तिंना आवश्यकतेनुसार देणेत येते. पांजरपोळची व्यवस्था व येथील जीवदयेच्या कार्याचे स्थानिक नागरीकांकडून कौतुक होत आहे. त्या मुळे त्यांच्या घरी होणाऱ्या लहान मोठ्या शुभ-अशुभ कार्याच्या निमित्ताने संस्थेची आठवण ठेवून त्यांच्या कडून दान प्रवाह चालू असतो. कोल्हापूरात येणाऱ्या जैन मुनि, साधु-साध्वी व हिंदु संत महात्मा पण जीवदयेचे महत्व समजावून नेहमी प्रेरणा करीत असतात. त्या मुळे प्राप्त होणाऱ्या दान प्रवाहाच्या सहयोगाने संस्थेचे काम सहजपणे अविरत चालू आहे.
जनावरांची सर्व प्रकारची देखभाल व चिकित्सा एकाच छताखाली होत असलेने दिन-प्रतिदिन जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे. जनावरांचे करिता सुविधा वाढविणे जरुरी असलेने संस्थेची गरजही वाढत चालली आहे. निभावासाठी येणारे फंड फारच कमी पडते. कायमी फंडचे फक्त व्याज उपयोगात घेणेत येते. संस्थेला बरीच तूट येत असलेने कायमी फंड वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.

निराधार, आजारी व अपंग जनावरांचे संरक्षण

योग्य उपचार, स्वच्छता व सुरक्षित निवारा

पशुखाद्य, औषधे व देखभाल

जखमी जनावरांचे पुनर्वसन

दैनंदिन गौसेवा व जनावरांचे संगोपन
संस्थेबद्दल
दक्षिण महाराष्ट्राच्या पवित्र भूमिवर
श्री महालक्ष्मी मंदिर, नरसोबावाडी, श्री जोतिबा मंदिर
श्री कुंभोजगिरी तीर्थ, सीमंधरधाम, कलश मंदिर,
इत्यादि तीर्थक्षेत्राच्या पावन सानिध्यात कोल्हापूर नगरीत
१०८ वर्षापासून जिवदये करिता कार्यरत
श्रीपांजरपोळ संस्था शाहूपुरी. कोल्हापूर.
स्थानिक संपर्क
श्री पांजरपोळ संस्था
१२९१ ई, शाहू मिलचे मागे,
राजारामपुरी सातवी गल्ली, कोल्हापूर – ४१६ ०००
- ०२३१-२६९२८७२, ३२५३६७६
- contactus@panjarpol.com
लोकेशन
© 2025 Designed with Pro Web Graphics